News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यात यावे - लघु उद्योग भारतीच्यावतीने आमदार रविंद्र चव्हाण यांना निवेदन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यात यावे - लघु उद्योग भारतीच्यावतीने आमदार रविंद्र चव्हाण यांना निवेदन

पनवेल -  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते,लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन लघु उद्योग भारती' संस्थेच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांना देण्यात आले

या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील 'लघु उद्योग भारती' या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांची स्नेहभेट घेत आपले निवेदन दिले. 

नवी मुंबईमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संबंधित कंत्राटे,विमानतळाशी संबंधित उत्पादन,बांधकाम सेवा क्षेत्राशी निगडित व्यवसायाच्या संधी रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकण पट्ट्यातील सूक्ष्म,लघु आणि मध्यम  उद्योजकांनाच उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. 

यासाठी महाराष्ट्र सरकारच्या विमानतळ,बांधकाम आणि व्यवस्थापनाशी संबंधित विभाग,अधिकारी यांच्यापर्यंत कसे पोहोचावे,याबाबत संस्थेला सोबत घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करेन,असे आमदार रवींद्र चव्हाण यांनी आश्वासन दिले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment