News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

१७ मार्च ..... BLACK DAY. सिडकोचा वर्धापन दिवस,काळा दिवस,निषेध दिवस पाळणार .... कळंबोली येथील सभेत ९५ गाव,नवी मुंबई,नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितीचा निर्णय

१७ मार्च ..... BLACK DAY. सिडकोचा वर्धापन दिवस,काळा दिवस,निषेध दिवस पाळणार .... कळंबोली येथील सभेत ९५ गाव,नवी मुंबई,नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितीचा निर्णय

पनवेल - नवी मुंबई प्रकल्पग्रस्त बाधित ९५ गावातील प्रकल्पग्रस्त,भूमिपुत्रांचे मूलभूत प्रश्न आजही सुटले नाहीत,याचा निषेध म्हणून १७ मार्च रोजी असणारा सिडकोचा वर्धापन दिन,हा काळा दिवस पाळण्यात येणार असल्याचे कळंबोली येथे झालेल्या प्रकल्पग्रस्त समितीच्या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.या बैठकीत नवी मुंबई प्रकल्पग्रस्त विविध संघटनांचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. 

१७ मार्च १९७० रोजी सिडको महामंडळाची स्थापना झाली त्या दिवसापासून नवी मुंबई प्रकल्पग्रस्त बाधित ९५ गावातील भूमिपुत्रांना प्रचंड अन्याय सहन करावा लागत असून अजूनही प्रकल्पग्रस्तांचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत 

येत्या १७ मार्च २०२५ रोजी सिडकोच्या स्थापनेला ५५ वर्षे पूर्ण होत असून सिडकोच्या स्थापनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यापासून प्रकल्पग्रस्तांच्या समितीने सिडको स्थापना दिवस हा काळा दिवस म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली असून दरवर्षी १७ मार्च हा काळा दिवस म्हणून प्रकल्पग्रस्त समिती पाळत,वैधानिक मार्गाने सिडकोचा निषेध करते.

या बैठकीत खालील विषयांवर चर्चा करण्यात आली त्यामध्ये, १) १७ मार्च २०२५ रोजी सिडको स्थापना दिवस हा निषेध दिन पाळण्यासाठी कार्यक्रमाचे स्वरूप व नियोजन  २) प्रकल्पग्रस्त बांधवांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काढलेला आदेश हा निवडणुकीचा जुमला आहे हे सिद्ध झाले आहे.आता प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली घरे नियमित करणे हा राजकीय निर्णय असून मंत्रालयातील कोणत्याही उच्चपदस्थ अधिकाऱ्याला हा निर्णय घेण्याचा अधिकार नाही हा निर्णय केवळ जनआंदोलनातून व राजकीय इच्छाशक्तीने मंत्रिमंडळ पातळीवरच होईल त्याबाबत चर्चा करणे  ३) सिडकोचा महत्वकांक्षी नैना प्रकल्प हटवण्याबाबत लढाईची पुढील दिशा ठरविणे  ४) नवी मुंबई,नैना,विरार अलिबाग कॉरिडॉर बाधित शेतकरी,लॉजिस्टिक पार्क,नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित शेतकरी,एमआयडीसी बाधित शेतकरी,मच्छीमार,मिठागर कामगार,आदिवासी बांधव या सर्वांच्या प्रश्नावर चर्चा करणे  ५)विरार अलिबाग कॉरिडॉरमध्ये विस्थापित होणाऱ्या गावांच्या समस्या सोडवण्यासाठी चर्चा करणे  ६) नवी मुंबई विमानतळासाठी संपादित जमिनीबाबत उच्च न्यायालय मुंबई यांनी अलीकडे दिलेल्या निर्णयाबाबत निर्णयाचा नक्की अर्थ व त्याबाबतची व्याप्ती यावर चर्चा करणे  ७) पनवेल महानगरपालिकेमार्फत प्रकल्पग्रस्त बाधित शेतकऱ्यांच्या घरांना जादा दराने आकारलेल्या मालमत्ता कराबाबत चर्चा करणे  ८) सिडकोने बेकादेशीर कपात केलेल्या पावणे चार टक्के भूखंड परत मिळणेबाबत योग्य ती कार्यवाही करणे या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment