खारघर येथे हेल्मेट डोक्यात हाणून मारहाण करून मृत्यू प्रकरण ...शिवकुमार शर्मा यांच्या मारेकऱ्यांवर तातडीने कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
पनवेल - खारघर येथे शिवकुमार शर्मा यांना मारहाण करून हत्या करण्याऱ्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी आ.प्रशांत ठाकूर यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे, त्याचप्रमाणे शिवकुमार शर्मा यांच्या आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी,यासाठी आ.प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत विश्व हिंदू परिषदेच्या शिष्टमंडळाने खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात, माझ्या मतदारसंघातील खारघर येथे दि.३१ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत इज्तिमा जमात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमात मार्गदर्शकांकडून भडकावू भाषण करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याबाबत तरूणांना मार्गदर्शन करण्यात आल्याचे समजते.खारघर येथील इज्तिमा कार्यक्रमातून बाहेर पडलेल्या दोन मोटार बाईकस्वार तरूणांनी रस्त्यावरून जाणाऱ्या शिवकुमार शर्मा या व्यक्तीला लक्ष करत शुल्लक कारणांवरून मारहाण करत जीवित हल्ला घडवून आणला असून त्यामध्ये शिवकुमार शर्मा यांचा दुर्देवी मृत्यू झालेला आहे.याबाबत खारघर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही.
खारघर येथे आयेजित इज्तिमा कार्यक्रमाचे आयोजन करित असताना आयोजकांनी वाहतूकीचे नियोजन स्विकारल्याचे अनेक फुटेजमधून दिसत आणि इज्तिमा कार्यक्रम संपल्यानंतर खारघर येथील बहुतेक ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून वाहतूक नियोजन झाल्याचे आढळले आहे.अशा परिस्थितीत इज्तिमामध्ये आलेल्या तरूणांमार्फत हेल्मेट डोक्यात हाणून मारहाण करून हत्या करण्याऱ्या तरुणाचा शोध घ्यायचा असल्यास वाहतुकीचे नियोजन करणाऱ्या ताब्यात घेतल्यानंतर खुन्याचा शोध घेणे सोपे जाईल.
तरी वाहतुकीचे नियोजन करणाऱ्या सर्व तरूणांना ताब्यात घेण्यात यावे व शिवकुमार शर्मा यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी तातडीने कारवाई करावी,अशी मागणी आ. प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.
Post a Comment