News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

परप्रांतीयांची फुटपाथ वरील अतिक्रमणे प्राधान्याने मोकळी करा - शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांच्या नेतृत्वात शिवसेनेची मागणी! ... कामोठे विभागात बड्या परप्रांतीय अनधिकृत उद्योगांवर कारवाई न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल

परप्रांतीयांची फुटपाथ वरील अतिक्रमणे प्राधान्याने मोकळी करा - शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांच्या नेतृत्वात शिवसेनेची मागणी! ... कामोठे विभागात बड्या परप्रांतीय अनधिकृत उद्योगांवर कारवाई न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल

पनवेल - परप्रांतीयांची फुटपाथवरील अतिक्रमणे प्राधान्याने मोकळी करा अशी मागणी शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांच्या नेतृत्वात पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या अतिक्रमणांवर जोरदार हातोडा सुरू आहे.अनधिकृत बिना परवाना धारक अतिक्रमण आठवडे बाजार या सर्वांवर मोठ्या प्रमाणात तोडक कारवाई व जप्तीची कारवाई चालू आहे परंतु हे होत असताना महापालिका क्षेत्रातील कामोठा- खारघर - नवीन पनवेल खांदा कॉलनी व सर्वच परिसरात खाद्यपदार्थ व स्वीट्सची मोठी - मोठी परप्रांतीयांची दुकाने ज्यांनी फुटपाथ गिळंकृत करत फूटपाथचेही भाडे घेत अनेक स्टॉल बिना परवाना अनधिकृत रित्या उभे केले आहेत अशांवर मात्र कारवाई होताना दिसत नाही याबाबत नाराजी व्यक्त करत शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांच्या नेतृत्वात महानगर संघटक मंगेश रानवडे, कामोठे शहर प्रमुख सुनील गोवारी, महिला तालुकाप्रमुख मंदाताई जंगले तळोजा विभाग प्रमुख प्रकाश म्हात्रे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली.यावेळेस नावडे विभागात नव्याने विकसित झालेल्या इमारती त समोरील नाल्यांची न होणारी साफसफाई,कचरा इत्यादी विषय देखील शिवसेनेच्या माध्यमातून तेथील रहिवाशांच्या प्रतिनिधींनी आयुक्तांसमोर मांडले तसेच आठवडा बाजार व अतिक्रमणांवर कारवाई करताना गरीब किंवा गरजू स्थानिक मराठी विक्रेत्यांपासून सुरुवात न करता फुटपाथ किंवा आसपासचा परिसर बेकायदेशीरपणे गिळंकृत करणाऱ्या परप्रांतीय व्यावसायिकांवर पहिले कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. आयुक्त मंगेश चितळे यांनी या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. 

याप्रसंगी चर्चेदरम्यान लवकरच खासदार श्रीरंग आप्पा बारणे व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक लावून सिडकोकडून मार्केट साठी विकसित करता येणारे भूखंड मिळवून घेणे व त्यावर स्थानिक मराठी उद्योजकांना परवाना देऊन व्यवसाय करण्याची संधी देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक त्या हालचाली करण्याचे निश्चित झाले. परंतु महापालिका प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरही विशेषतः कामोठे विभागात या बड्या परप्रांतीय अनधिकृत उद्योगांवर कारवाई न झाल्यास शिवसेना त्यांच्याविरुद्ध रस्त्यावर उतरेल असे शहर प्रमुख सुनील गोवारी यांनी सांगितले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment