भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने पनवेल महापालिकेत अभिवादन ... महानगरपालिकेच्या सर्व मराठी शाळांमध्ये बालिका दिन साजरा
पनवेल,दि.3: पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपायुक्त कैलास गावडे,उपायुक्त बाबासाहेब राजळे,उपायुक्त प्रसेनजित कारलेकर,मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे,मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे,मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.आनंद गोसावी,लेखा परिक्षक संग्राम ऱ्होरकाटे,सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे,लेखा परिक्षक संदिप खुरपे ,सामान्य प्रशासन विभागप्रमुख दशरथ भंडारी,महापालिका अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
सर्व शाळांमध्ये मराठी शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.पनवेल महानगरपालिकेच्या सर्व मराठी शाळांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शाळांमध्ये भाषण व नृत्य , वेशभूषा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ७ तक्का येथे आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनानुसार व पनवेल महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण यांच्या प्रेरणेने व अधीक्षक कीर्ती महाजन व शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या सावळे यांच्या नियोजनानुसार सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका संगीता गवारे व इतर सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बाल सभेचे आयोजन करण्यात आले तसेच शाळेतील इयत्ता पहिली व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषा केल्या होत्या.यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापिका यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर अशी बालसभा घेऊन भाषणांच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट व कार्य इतर सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडले.शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी बालसभेमध्ये सहभागी होऊन बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
Post a Comment