पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी प्रशांत शेडगे
पनवेल (प्रतिनिधी)- रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या अंतर्गत पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लबची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी पत्रकार प्रशांत शेडगे यांची एकमताने निवड करण्यात आली.
मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीकर आणि रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे व विजय मोकल तसेच अनिल भोळे यांच्या उपस्थित पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लबची स्थापना करण्यात आली.यामध्ये उपाध्यक्षा तृप्ती पालकर,सरचिटणीस हरेश साठे,कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील आणि खजिनदार म्हणून दत्तात्रय कुलकर्णी,सल्लागार नितीन देशमुख यांची निवड करण्यात आली.जेष्ठ पत्रकार गणेश कोळी,संजय कदम,सुमन नलावडे ,नितीन कोळी,रायगड प्रेस क्लबचे विश्वस्त विजय मोकल आणि अनिल भोळे उपस्थित होते.यावेळी पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लबचे अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की पत्रकार संघटनेच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवून समाजामध्ये आदर्श निर्माण करू तसेच जास्तीत जास्त तळागाळातील घटकांपर्यंत पोहचून गरजवंतांना मदतीचा हात देऊ.अध्यक्षपदी शेडगे यांची निवड झाल्यावर समाजातील सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.पनवेल शहर जुने भाजी मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कमलाकर मुंडकर
आणि उपाध्यक्ष सोमनाथ इचके यांच्या सह सर्व व्यापारी वर्गाने अध्यक्ष प्रशांत शेडगे यांचं पुष्पगुछ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post a Comment