सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधले ... ५ कोटी रुपये किंमतीच्या सुपारी व मिरीच्या मालाची चोरी
पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः- जवळपास 5 कोटी रुपये किंमतीच्या सुपारी व मिरीच्या मालाची तेथील सुरक्षा रक्षकांना धमकावून अज्ञात टोळीने चोरी केल्याची घटना पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील आशेरा वेअर हाऊस येथे घडली आहे.
आशेरा वेअर हाऊस शिरढोण येथील आलसेन शिपींग अॅण्ड लॉजिस्टीक्स प्रा.लि. कंपनीच्या गाळ्यामध्ये कस्ट विभागाकडून कस्टम ड्युटी न भरलेला तीन कंपनींच्या सुपारी व मिरी असा माल ठेवलेला असताना सदर ठिकाणी एक ट्रेलर कंटेनरसह व चार लहान ट्रकसह सुमारे 30 ते 35 इसमांनी तेथे येवून त्यांच्यापैकी एका इसमाने तेथील सुरक्षा रक्षकास चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी देवून त्याच्या व त्याच्या सहकार्यांनी सदर सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधले तसेच दुसर्या सुरक्षा रक्षकाला सुद्धा जीवे मारण्याची धमकी देवून त्याच्याकडे असलेल्या कटर मशिनच्या सहाय्याने गाळ्याच्या शटरला असलेली कुलूपे तोडून आत प्रवेश करून जवळपास 5 कोटी रुपये किंमतीच्या सुपारी व मिरी हा माल व सुरक्षा रक्षकाचा एक मोबाईल असा चोरुन नेवून ते पसार झाले आहेत. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध चोहोबाजूने सुरू आहे.
Post a Comment