News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

खारघरमध्ये दारूच्या नशेत अज्ञात तरुण चढला हाय-टेंशन टॉवरवर

खारघरमध्ये दारूच्या नशेत अज्ञात तरुण चढला हाय-टेंशन टॉवरवर

पनवेल, दि.24 (वार्ताहर) ः-  प्रसिद्ध शोले चित्रपटात जसा धर्मेंद्र म्हणजेच वीरू बसंतीसाठी दारूच्या नशेत उंच पाण्याच्या टाकीवर चढतो तसाच काहीसा प्रसंग खारघर येथे घडला असून सदर तरुण दारुच्या नशेत महावितरणाच्या हाय-टेंन्शन टॉवरवर चढला.
खारघर येथील सेक्टर 3 मध्ये अज्ञात तरुणाने हाय-टेंशन इलेक्ट्रिक टॉवरवर चढून एक तासांचा हाय व्होल्टेज ड्रामा केला.सदर तरुण दारूच्या नशेत होता.पोलीस, अग्निशमन दल आणि वाहतूक पोलीसांच्या जवळपास एक तासांच्या प्रयत्नानंतर हा तरुण खाली आला. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले.खारघर येथील बेलपाडा आदिवासीवाडीच्या हाय टेंशन टॉवर आहे.याच टॉवर सदर तरुण चढला.सदर तरुण टॉवरवर चढल्याचे पाहताच आजूबाजूच्या लोकांनी गर्दी करून सदर घटनेची माहिती पोलीस व वाहतूक पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस येवून त्यांनी सदर तरुणाला खाली उतरण्याची विनंती केली.दरम्यान एक तासानंतर सदर तरुण खाली उतरला.यावेळी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment