समाजवादी पार्टी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन यांचा प्रितम म्हात्रे यांना पाठिंबा
उरण : समाजवादी पार्टी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन यांनी उरणचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रितम म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.,तसे पत्र त्यांनी दिले आहे.यावेळी माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, शेकाप तालुका चिटणीस नारायणशेठ घरत यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
समाजवादी पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल नाईक यांनी उरण विधानसभेचे शेकापचे उमेदवार प्रितम म्हात्रे यांना पाठिंबा दिला तर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकनचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी देखील पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे.त्यामुळे पनवेल आणि उरण मध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद वाढली आहे. नागरिकांनी पनवेल आणि उरणमध्ये शेकापच्या उमेदवारांना मतदान करावे असे आवाहन अनिल नाईक आणि महेश साळुंखे यांनी केले आहे.
Post a Comment