विकासासोबत रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेत जाण्याची मला संधी द्या- शेकाप उमेदवार प्रितम म्हात्रे
उरण : पनवेल तालुक्यातील पोसरी, गिरवले, नारपोली सावळा या भागात माजी आमदार विवेक पाटील यानी भरीव विकासाची कामे केली असून त्यानंतर माञ आलेल्या लोकप्रतिनीधीचे या भागाकडे दुर्लक्ष झाले.हा विकासाचा गॅप आपल्याला भरून काढून तालुक्याचा रोजगाराचा प्रश्न सोडवायचा आहे,त्यासाठी शिट्टीच्या चिन्हा समोरील बटण दाबून आपल्याला संधी द्यावी असे प्रतिपादन उरण विधानसभेचे उमेदवार प्रितम म्हाञे यानी केले.
शेकाप उमेदवार प्रितम म्हात्रे यानी कष्टकरीनगर पोसरी, नारपोली,गिरवले,सावळा,देवळोली,कसळखंड,भाताण गावात निवडणूक दौरा केला,त्यावेळी गावागावातून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.दौऱ्यात त्यांच्यासोबत नारायणशेठ घरत,मनोहर पाटील,जगदिश पवार,सचिन ताडफळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना प्रितम म्हात्रे म्हणाले की युवकाच्या रोजगाराचा प्रश्न आज गंभीर आहे तो सोडविण्यासाठी आपण प्रशिक्षण सुरू केले असून विमानतळात 44 जणाना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत.भविष्यात ही संख्या मोठी असेल हे काम मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी आपण मला संधी द्यावी असे आवाहन प्रितम म्हात्रे यांनी केले. यावेळी आपच्या संघटन मंञी डा.शेख यानी प्रितम म्हाञे याना पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याचे पञ दिले.
Post a Comment