उरण विधानसभा शेकापक्षाचे उमेदवार प्रितम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ उरणमध्ये सभेचे आयोजन, शेकाप नेते जयंत पाटील यांची तोफ धडाडणार
उरण : महाविकास आघाडी इंडिया,अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रितम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ 15 नोव्हेंबर रोजी डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्राथमिक मराठी शाळेचे मैदान,उरण येथे सायंकाळी 6 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये माजी आमदार भाई जयंत पाटील यांची तोफ धडाडणार आहे.या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
उरण विधानसभेचे उमेदवार प्रितम म्हात्रे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.अनेक मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत.प्रितम म्हात्रे यांना गावागावातून, शहरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.उरण शहराचा विकास हवा असेल तर प्रीतम म्हात्रे यांना निवडून देणे गरजेचे आहे.ळ प्रितम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातून, बीजेपीतून शेतकरी कामगार पक्षात पक्ष प्रवेश केला जात आहे. त्यामुळे भाजपला खिंडार पडले आहे.शुक्रवार 15 नोव्हेंबर रोजी प्रितम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ उरण प्राथमिक मराठी शाळेसमोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार भाई जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी जयंत पाटील यांची तोफ धडाडणार आहे.
Post a Comment