शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला वगळून पनवेल महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्याची पनवेलच्या काँग्रेस भवनमध्ये उद्या बैठक ....
पनवेल- पनवेल विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील (शेकाप) यांच्या निवडणूक प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला वगळून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याची बैठक काँग्रेस भवन,पनवेल येथे उद्या सकाळी 11 वाजता आयोजित केली आहे.या बैठकीसाठी महाविकास आघाडीचे सर्वपक्षीय नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून निवडणूकी बाबतीत मतदारांच्या नियोजनाची चर्चा करणार आहेत.
या बैठकीला,भावनाताई घाणेकर,
(प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस महिला तथा निरीक्षक कोकण,पनवेल,नवी मुंबई), सतीश मोहन पाटील, (जिल्हाध्यक्ष पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार),सुदाम गोकुळ पाटील
(जिल्हाध्यक्ष पनवेल शहर जिल्हा काँग्रेस),फारूक पटेल, (सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस),सुरदास गोवारी,(सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस),काशिनाथ पाटील,(विधानसभा अध्यक्ष शेकाप),एकनाथ दत्तू म्हात्रे,
(महाविकास आघाडी नेते),नंदराज मुंगाजी(तालुकाध्यक्ष काँग्रेस),अनिल वसंत नाईक (जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी), गणेश कडू (चिटणीस शेकाप),सुभाष गायकवाड (भीमशक्ती संघटना पनवेल),मनोज भरत बिरादार (आम आदमी पार्टी) यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
Post a Comment