पळस्पे फाटा येथे ३ लाख ४९ हजार ५०० रुपयांची रोकड पकडली ... भरारी पथकाची कारवाई
पनवेल- पळस्पे फाटा येथे ३ लाख ४९ हजार ५०० रुपयांची रोकड पकडली.पनवेल विधानसभा निवडणूक विभागांतर्गत आचारसंहिता पथकांतर्गत भरारी पथकाने वाहन तपासण्याचे कर्तव्य करीत असताना मुंबई- गोवा हायवे येथील पळस्पे फाटा चेक नाका येथे रोडवरून जाणाऱ्या सुपर कॅरी टेम्पो या चार चाकी गाडीला थांबून तपासणी केली असता गाडीमध्ये ( MH- 46- BM- 8620) तीन लाख 49 हजार पाचशे रुपये रोख रक्कम आढळून आली,सदरील रक्कम संशयास्पद असल्याने ही रक्कम भरारी पथकाने जप्त केली.
Post a Comment