परतीच्या पावसाने पनवेल तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान ....शेतीच्या कामासाठी मर्जीनुसार मजुरीचा भाव
पनवेल- परतीच्या पावसाने पनवेल तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुक्यात यावर्षी 5990 हेक्टरवर भातशेती करण्यात आली होती.मात्र परतीच्या पावसात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले.यामध्ये 100 हेक्टरपेक्षा जास्त भातशेतीचे नुकसान झाले आहे,अद्यापही अनेक ठिकाणचा पंचनामा झाला नसल्याने नुकसान भरपाईचा अहवाल समोर आलेला नाही.यंदा भात पिकाला पोषक वातावरण होते,मात्र पीक ऐन भरात असताना पावसाने धुमाकूळ घातला आणि भात शेतीचं झोडपून काढली. अद्यापही अनेक ठिकाणी भात पिके खाली पडलेली आहेत.मात्र पावसाने उघडीप दिल्याने भात कापणीसह बांधणीच्या कामाला वेग आला आहे.दुसरीकडे इतरही पिकांची काढणी,शेती कामे सुरु असल्याने कापणीसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत.मजुरीचा दरही वाढल्याने एका दिवसाच्या कापणीला दोन-दोन दिवस लागत आहेत.शेतीच्या कामासाठी शोधूनही मजूर मिळत नाहीत.मजूर मिळाल्यास त्यांच्या मर्जीनुसार मजुरी द्यावी लागत आहे.गेल्या काही वर्षांपासून भात कापणीसाठी यंत्राचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. मात्र हे यंत्रही अपुरे पडत असल्याचे चित्र आहे.परिणामी प्रति एकर लागवडीचा खर्चही वाढलेला आहे.
कापणी आणि बांधणीचा खर्च किती? .....
सद्यःस्थितीत शेतकरी हलके धान कापणी तसेच बांधणीच्या कामात व्यस्त आहेत.धान कापणीसाठी महिला मजुरांना 400 ते 500 रुपये मोजावे लागत आहेत,तर बांधणीसाठी पुरुषांना प्रतिदिन 600 ते 700 रुपये मोजावे लागत आहेत.त्यामुळे भात शेती जर जास्त असेल शेतकऱ्यांना कापणी आणि बांधणीचा खर्च न परवडणारा आहे.त्यातच मजुरांची टंचाई असल्याने अधिक वेळ खर्ची जात आहे.
Post a Comment