News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

आचारसंहिता भंगाच्या ४६८३ तक्रारी निकाली; ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता आजपर्यंत जप्त

आचारसंहिता भंगाच्या ४६८३ तक्रारी निकाली; ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता आजपर्यंत जप्त

मुंबई, दि. ११ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ४ हजार ७११ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४ हजार ६८३ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत,अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

 नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

 

४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसेदारूअंमली पदार्थ व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत दि. १५ ऑक्टोबरपासून आजपर्यंत एकूण ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment