News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

दिवाळी पहाट सोहळ्यात पनवेल महानगरपालिकेची मतदान जनजागृती ..नागरिकांना मतदानाची शपथ

दिवाळी पहाट सोहळ्यात पनवेल महानगरपालिकेची मतदान जनजागृती ..नागरिकांना मतदानाची शपथ

पनवेल : पनवेल  महानगरपालिकेच्यावतीने पहाटे वडाळे तलाव परिसरात आयोजित केलेल्या 'दिवाळी पहाट' कार्यक्रमध्ये आनंद गंधर्व पंडीत आनंद भाटे आणि सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे सुश्राव्य गाण्यांने रसिक पनवेलकर मंत्रमुग्ध झाले.महापालिकेने परंपरा जपत मतदान जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास पनवेलकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. 

यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री.मंगेश चितळे,निवडणूक निर्णय अधिकारी श्री.पवन चांडक , अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ,उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ.वैभव विधाते,शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद गोसावी, सहायक आयुक्त श्रीराम पवार,कार्यकारी अभियंता सुधीर सांळुखे, महापालिका अधिकारी ,कर्मचारी व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 
गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिकेच्यावतीने पनवेलकरांची दिवाळी सुरमयी व्हावी यासाठी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करते आहे. यावर्षी विधानसभा निवडणुक 2024 निमित्ताने या कार्यक्रमाच्या माध्यमातून  स्वीप कार्यक्रमांत मतदान जनजागृती यावेळी करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री.पवन चांडक यांनी नागरिकांना 'मतदान शपथ' दिली. 

तसेच महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. मंगेश चितळे यांनी नागरिकांनी येत्या  २० नोंव्हेबरला मतदानाच्या हक्काची अमंलबजावणी करण्यासाठी, सुजाण लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन उपस्थितांना केले. तसेच उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 

दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयुक्तांनी आनंद गंधर्व पंडीत आनंद भाटे आणि पार्श्वगायिका गायिका प्रियांका बर्वे , निवेदिका दिप्ती भागवत यांचा स्मृती चिन्ह व पुप्षगुच्छ देऊन सन्मान केला. उपायुक्त डॉ वैभव विधाते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गेल्या आठवड्यापासून उपायुक्त कैलास गावडे व शहर अभियंता संजय कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. 


यावेळी गायिका प्रियांका बर्वे यांनी कवी सुरेश भट यांची गजल केव्हा तरी पहाटे गाण्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. लोकसंगीत सादर करताना जाळी मंदी पिकली करवंद ही लावणी सादर केली. तसेच अभंग अवचिता परिमळू, नाट्य संगीतामध्ये नाही मी बोलत हे नाट्यपद सादर केले. 

गायक आनंद भाटे यांनी संगीत सौभद्र नाटकामधील राधा धर मधू मिलिंद जय जय ,रम्य ही स्वर्गाहून लंका, संगीत मानापमानमधील युवती मना दारूण रण अशी अनेक नाट्यपदे सादर करून रसिक श्रोत्यांची मने जिंकली. याचबरोबर लक्ष्मी बारम्मा, बाजे मुरली या बाजे, बोलावा विठ्ठल, माझे माहेर पंढरी,अवघा रंग झाला, चिन्मया सकल ऱ्हदया अशी सुंदर भजने सादर केली.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment