काँग्रेस पक्ष,जो आदेश देईल त्या उमेदवाराचे काम करणार - काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत
पनवेल / प्रतिनिधी - काँग्रेस पक्ष,जो आदेश देईल त्या उमेदवाराचे काम करणार असल्याचे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी शेलघर येथे आयाेजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.राजकीय भाष्य करताना महेंद्रशेठ घरत म्हणाले,आता मला निवडणूक लढवायची नाही पण पक्षाकडे कार्यकर्तेच माझ्यासाठी निवडणुकीचे तिकीट मागत होते,आता पक्ष जो आदेश देईल त्या पक्षाचे अर्थात त्या उमेदवाराचे काम करणार असल्याचे सांगितले.
न्यु मॅरिटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटनेच्या कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीचे करार झाले. त्याचप्रमाणे संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील नविन युनिट्सची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये न्यु मॅरिटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटनचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी माहिती दिली.यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष पी.के.रमण,सरचिटणीस वैभव पाटील आदी यावेळी उपस्थित होते. संघटनेने दहा वर्षांत मोठी झेप घेतली आहे.कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळाले पाहिजेत,यासाठी आम्ही लढा देत आहोत. कर्मचाऱ्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत.आम्ही कुठलेही काम करताना थांबत नाही, काम करतो.संघटनेच्या कार्याची आज जी भरारी आहे त्याचे सर्व श्रेय हे कामगारांचे असल्याचे यावेळी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी सांगितले.
Post a Comment