मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा स्पर्धेत जिल्हा परिषदेची तळोजा-पाचनंद शाळा पनवेल तालुक्यात प्रथम,तीन लाखाचे हे पारितोषिक
अभियानांतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या पनवेल तालुक्यातील तळोजा-पाचनंद शाळेला पनवेल तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला आहे,तीन लाखाचे हे पारितोषिक आहे.
तळोजा पाचनंद शाळेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत पनवेल तालुक्यात शाळेने प्रथम क्रमांक पटकावला.पनवेल मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राज्यातील अनेक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला व हे अभियान यशस्वी होण्यासाठी योगदान दिले या अभियानामध्ये रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळोजे पाचनंद शाळेने ही सहभाग घेतला हा सहभाग केवळ स्पर्धेतील नोंद नसून एक अथक प्रवास मानावा लागेल कारण शाळेचा पूर्ण कायापालट नावीन्यपूर्ण सृजनशील नवनिर्मितीचा ध्यास घेत शाळेने या स्पर्धेमध्ये आपली एक वेगळी छाप पाडली आणि तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळाला तालुका व जिल्हास्तरीय कमिटी समोर शाळेच्या विद्यार्थ्यांनी इत्यंभूत माहिती सांगितली परसबाग स्टीम लॅब वाचनालय क्रीडा विभाग वर्ग खोल्या शालेय परिसर यांची माहिती विद्यार्थ्यांनी पूर्ण आत्मविश्वासाने आदरणीय शिक्षणाधिकारी सौ पुनीता गुरव यांना दिली सुसज्ज शालेय इमारत परसबागेतील विविध भाज्या ,तंबाखूमुक्त शाळा नीट नेटके स्वच्छ शालेय परिसर तसेच तंबाखूमुक्त शालेय परिसर प्रमाणपत्रासहित साक्षांकित असलेली शाळा इतकेच नव्हे तर स्वच्छता मॉनिटर या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी करून त्यातही विद्यार्थ्यांनी बक्षीस मिळवले आहे.
शाळेचे रूप पालटण्याचे श्रेय दोन संस्था इनोबल व सोसायटी जनरल यांचे तर आहेच त्याचबरोबर पनवेल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.मोहिते,केंद्रप्रमुख श्री. वसंत मोकल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा अंकुश पाटील यांच्या मार्गदर्शनाने शाळेच्या नव्या रूपाला अर्थ आला तसेच श्रीमती विभावरी सिंगासने,श्री. राम प्रसाद केकान सर सुचिता गिजे श्री गणेश म्हात्रे श्री.प्रवीण रेवाळे,श्री कुमार शिर्के,सौ.कीर्ती खारपाटील व श्रीमती योगिनी वैदू यांनी शाळेच्या अनेक उपक्रमांमध्ये शालेय कामकाजामध्ये एकसंधता आणून मोलाची कामगिरी बजावत या स्पर्धेमध्ये उत्तुंग यश मिळवण्यास आपले योगदान दिले आहे तसेच या उपक्रमाला शालेय व्यवस्थापन श्री विक्रम गायकवाड,उपाध्यक्ष किशोर कांबळे व सर्व सदस्य यांनी सहकार्य केले या यशाबद्दल केंद्रप्रमुख वसंत मोकल केंद्रप्रमुख निंबाजी गीते, गटशिक्षणाधिकारी श्री.सिताराम मोहिते यांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले व या यशानंतर मुख्याध्यापक व सर्व शिक्षक विद्यार्थी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
Post a Comment