जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही ...... पनवेलमधून २९ उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज
रायगड (जिमाका)दि.23 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरण्यास दि. 22 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे.आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील 7 ही विधानसभा मतदारसंघात एकही नामनिर्देशन दाखल झाले नसल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.उमेदवारी अर्ज घेवून गेलेल्यांची मतदारसंघ निहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. 188-पनवेल 29 अर्ज, 189-कर्जत 8 अर्ज, 190-उरण 22 अर्ज, 191-पेण 9 अर्ज, 192-अलिबाग 16, 193-श्रीवर्धन 9 अर्ज, 194-महाड 8 अर्ज.
Post a Comment