ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबला ... कारच्या अपघातात १ ठार ४ जखमी .. खारघर येथील घटना
पनवेल (वार्ताहर)- ः रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात गाडीचा ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबल्यामुळे गाडी रस्त्याच्या दुभाजकाला धडकून उलटल्याने झालेल्या अपघातात गाडीतील १ जण ठार तर इतर ४ जखमी झाल्याची घटना खारघर येथे घडली आहे.
कार चालक अर्णव बिरारी (18), पक्ष सावरिया (18), यश मोर्या (18), कु.अग्रीम पराशर व दर्श जैन (18) हे पाच जण खारघर पेठ पाडा येथील एन.एन.आय.एम. कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहेत. यातील अर्णव बिरारी या विद्यार्थ्याने त्याच्या वडिलांची गाडी कॉलेजमध्ये आणली होती. त्यानंतर हे पाच ही जण गाडीतून खारघरमधून फेरफटका मारण्यासाठी गेले यावेळी अर्णव गुरुद्वारासमोरील रोडवरुन जात असताना त्याने रस्त्यावरील खड्डा चुकविण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने कारचे स्टेअरिंग उजव्या बाजूस वळविले असता ही गाडी रस्ता दुभाजकाला घासली त्यामुळे गोंधळलेल्या अर्णवने ब्रेक दाबण्याऐवजी कारचे एक्सलेटर दाबले त्यामुळे कार भरधाव वेगाने पुढे जावून ती रस्त्याच्या दुभाजकाला जावून जोरदार आदळली व पलटल्याने झालेल्या अपघातात दर्श जैन हा गंभीररित्या जखमी होवून मयत झाला आहे. तर त्याचे इतर 4 मित्र जखमी झाले आहेत.या अपघाताची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Post a Comment