कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या युनियनचे २६ कामगार व पदाधिकारी मोरोक्कोसाठी रवाना!
पनवेल- इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (ITF) लंडन या बहुराष्ट्रीय संघाचे अधिवेशन दर चार वर्षांनी होत असते.मागील अधिवेशन सिंगापूर येथे झाले होते त्यावेळी न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे तब्बल ५० कामगार व पदाधिकारी या अधिवेशनास गेले होते.यावर्षी १३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर रोजी मोरोक्को (आफ्रीकन देश ) येथे हे अधिवेशन भरलेले आहे. या अधिवेशनासाठी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या संघटनेचे तब्बल २६ कामगार व पदाधिकारी दिनांक ११ ऑक्टोबर रोजी मोरोक्कोसाठी रवाना झाले. आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत असतांना माझ्या कामगारालाही बाहेरच जग फिरता आले पाहिजे त्याला परदेशातील कामगारांच्या समस्या,मागण्या कळल्या पाहिजेत या उद्देशाने कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे या कामगारांना परदेशातील अधिवेशनासाठी घेऊन जात आहेत.असा विचार करणारे महेंद्रशेठ घरत हे एकमेव कामगार नेते आहेत.या सर्वांना विमानात बसण्याची संधी मिळतेय व परदेश पाहण्यासाठी सर्व उत्सुक असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
Post a Comment