News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

विधानसभा निवडणूक ... पनवेलजवळील शेडुंग चेकनाका येथे तपासणी कारवार्ईमध्ये ४ लाख ३१ हजाराची रोकड जप्त

विधानसभा निवडणूक ... पनवेलजवळील शेडुंग चेकनाका येथे तपासणी कारवार्ईमध्ये ४ लाख ३१ हजाराची रोकड जप्त

पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः  - पनवेल  विधानसभा मतदारसंघ,निवडणूक विभागअंतर्गत आचारसंहिता पथकांतर्गत स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक 6 (एसएसटी पथक ) ने पनवेलजवळील शेडुंग टोल नाका येथे वाहन तपासण्याचे कर्तव्य करत असताना रात्रौ 23:55 वाजण्याचे जुन्या मुंबई-पुणे हायवे रोडवरुन जाणार्‍या हुंडाई ऑरा पांढर्‍या रंगाची चारचाकी गाडी थांबवून तपासणी केली असता त्या गाडीमध्ये 4 लाख 31 हजाराची रोख रक्कम आढळून आली.सदरील रक्कम संशयास्पद असल्याने ही रक्कम पथकामार्फत जप्त करण्यात आली.

सदर कारवाई 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईवेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील, आचारसंहिता पथकप्रमुख भारत राठोड, सहाय्यक खर्च निरीक्षक विजय फासे,सहाय्यक खर्च निरीक्षक संजय आपटे,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय भालेराव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदिप कराड,आचारसंहिता पथकप्रमुख महेश पांढरे,आचार संहिता सनियंत्रण अधिकारी शरद गीते,सहाय्यक आचार संहिता पथकप्रमुख जी.एस.बहिरम,सहाय्यक आचार संहिता पथक समन्वयक दिनेश भोसले,नितेश चिमणे, तुषार म्हात्रे,नितेश चिमणे,आशा डोळस,शेडुंग टोल पोस्ट एसएसटी पथकाचे प्रमुख कैलास चव्हाण,तळोजा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक श्रीराम सैदाणे व पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अक्षय वाधमोर आदी पथक उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment