जिल्ह्यात आज पाच नामनिर्देशनपत्र दाखल ... कर्जत,उरण आणि श्रीवर्धन मतदारसंघात अर्ज दाखल
रायगड(जिमाका) दि.25:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरण्यास दि.22 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघा पैकी कर्जत, उरण आणि श्रीवर्धन मतदारसंघात तीन उमेदवारांची पाच नामनिर्देशनपत्र दाखल झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची माहिती पुढीलप्रमाणे :-
189-कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये आज 1 उमेदवारांनी 1 नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे. श्री.सुधाकर परशुराम घारे (अपक्ष).
190-उरण विधानसभा मतदार संघामध्ये आज 1 उमेदवारांनी 1 नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे. श्रीकन्या तेजस डाकी (अपक्ष).
193-श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये आज 1 उमेदवारांनी 3 नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे. कुमारी आदिती सुनिल तटकरे, (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी).
जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरु असून दि.29 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. या सर्व अर्जाची दि.30 ऑक्टोबरला छाननी करण्यात येणार असून दि.4 नोव्हेंबर 2024 रोजी अर्ज मागे घेता येणार आहे. मतदान दि.20 नोव्हेंबरला होत असून दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.
Post a Comment