News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

महानगरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवा - माजी नगरसेवक अ‍ॅड.मनोज भुजबळ,शेकापक्षाचे महादेव वाघमारे यांची महानगरपालिकेकडे मागणी ...अन्यथा शेकापतर्फे १५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण ..

महानगरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवा - माजी नगरसेवक अ‍ॅड.मनोज भुजबळ,शेकापक्षाचे महादेव वाघमारे यांची महानगरपालिकेकडे मागणी ...अन्यथा शेकापतर्फे १५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण ..

नवीन पनवेल परिसरातील प्रभाग क्र.१७ येथे   
पडलेले मोठमोठे खड्डे बुजविण्याची माजी नगरसेवक अ‍ॅड.मनोज भुजबळ यांची मागणी
पनवेल-  नवीन पनवेल परिसरातील प्रभाग क्र.17, सेक्टर नं.12 ते 19 मध्ये पावसामुळे रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी पनवेल महापालिकेकडे मा.नगरसेवक अ‍ॅड.मनोज भुजबळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनात मनोज भुजबळ यांनी म्हटले आहे की,यावर्षीच्या प्रचंड पावसामुळे व वेळोवेळी एजन्सीने केलेल्या खोदकामामुळे नवीन पनवेल पूर्व तसेच पनवेल पश्‍चिमकडील प्रभाग क्र.17 मध्ये रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले असून लवकरच विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता असून त्यानंतर रस्त्याची कामे,खड्डे बुजविणे केवळ आचारसंहिता आहे म्हणून काम करता येणार नाही अशी उत्तरे महापालिकेच्या अधिकारी वर्गाकडून मिळण्याची शक्यता आहे. पडलेले खड्डे हे मोठ्या प्रमाणात असून वाहन चालकांसह पादचार्‍यांना ये-जा करणे मुश्कीलचे बनले आहेत. तसेच नेहमीच अपघात घडत आहेत.वाहतूक कोंडी होत आहे. तरी महापालिकेने लवकरात लवकर खड्डे भरुन घ्यावेत अन्यथा कठोर पाऊले उचलावी लागतील,असा इशारा मनोज भुजबळ यांनी दिला आहे.

अन्यथा शेकापतर्फे 15 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण ....
          पनवेल- पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पडलेले खड्डे हे चांगल्या दर्जाच्या डांबराने बुजवावेत अन्यथा शेकापतर्फे 15 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल असा इशारा शेकाप पनवेल महापालिका जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी आज पनवेल महापालिकेच्या उपायुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी त्यांच्यासोबत पनवेल शहर चिटणीस नंदकिशोर भोईर, पराग भोपी,संदेश डिंगोरकर, पनवेल अर्बन बँकेचे संचालक दिलीप कदम उपस्थित होते. या निवेदनात महादेव वाघमारे यांनी म्हटले आहे की, महानगरपालिका क्षेत्रातील खड्डे बुजविण्याकरिता महापालिकेने नेमलेल्या ठेकेदाराकडून चांगल्या दर्जाचे डांबर न वापरता खड्डे बुजविण्यात येत आहेत. या संदर्भात वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत.सध्या स्थितीत खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे,खारघर,तळोजा फेज-1 आणि फेज-2 या ठिकाणी प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. दुचाकीसह चारचाकी वाहनांना या खड्ड्यांमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक वाहनांचे टायर सुद्धा फुटले आहेत.तरी सदर खड्डे बुजविण्यासाठी चांगल्या दर्जाच्या डांबराने बुजवावेत अन्यथा शेकापतर्फे 15 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल असा इशारा शेकाप पनवेल महापालिका जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी आज पनवेल महापालिकेच्या उपायुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment