News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

महीला सक्षमीकरण अभियानाच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांचा सन्मान

महीला सक्षमीकरण अभियानाच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांचा सन्मान

पनवेल - : रायगड जिल्ह्यातील माणगांव येथे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना “वचनपुर्ती” सोहळा कार्यक्रमामध्ये पनवेल महानगरपालिकेच्यावतीने महिला सक्षमीकरण अभियानाच्या प्रभावी अमंलबजावणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री कु.अदिती तटकरे ,खासदार श्री.सुनिल तटकरे,आमदार श्री.भरत गोगावले यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देऊन आयुक्त श्री.मंगेश चितळे यांना सन्मानीत आले. 

पनवेल महानगरपालिकेच्यावतीने महिला सक्षमीकरणासाठी आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न केले जात आहे. महिला सक्षमीकरण अभियानाच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत तळागाळातील सुमारे 1 लाख 4 हजार महिलांना लाभ दिला आहेत.शासनाने ही योजना सुरू केल्यापासून महापालिकेने विविध उपक्रमाच्या माध्यमातून सर्व स्तरातील महिलांपर्यत जाऊन या योजनेचा लाभ दिला आहे.सुरूवातीला प्रत्येक प्रभागामध्ये महिलांना अर्ज भरण्यासाठी केंद्र सूरू करण्यात आली.त्यानंतर महापालिकेत मदत कक्ष सुरू करण्यात आले.रिक्षाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.तसेच या योजनेची माहिती देणारे बल्क मेसेजस महिलांना करण्यात आले. तसेच मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून गावोगावी आदिवासी पाड्यांवरील महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरण्यात आले. इतकेच करून महापालिका थांबली नाही तर याकामासाठी विशेष वॉररूम पालिकेने उभारून युध्दपातळीवर लाभार्थी महिलांचेअर्ज भरले. याचेच फलित म्हणजे 1 लाख 4 हजार महिलांना या योजनेचा आत्तापर्यंत लाभ मिळाला आहे.

तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत बचत गटाच्या माध्यमातून आजवर 3 हजाराहून अधिक महिलांना उद्योग व  व्यवसाय करिता कर्ज उपलब्ध करून स्वत:च्या पायावर उभे केले आहे.बचत गटातील एकूण 221 महिलांना स्वतःचा व्यवसाय वाढीकरिता वैयक्तिक कर्ज एकूण रु. 14647900 इतके कर्ज देण्यात आले आहे. तसेच एकूण 92 बचत गटांना रु.16073911 इतके कर्ज दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत देण्यात आले आहे.
महिला सक्षमीकरणासाठी बचत गटातील महिलाबरोबर इतर महिलांना वित्तीय साक्षरता व नेतृत्व विकास ,पेपर बॅग,शिलाई पार्लर,वाहन चालक,उद्योजकता ,बेकरी इत्यादीचे प्रशिक्षण दिले आहे.याचबरोबर बचत गटातील महिलांना नेहमीच्या साच्याबाहेर जाऊन अमृत योजनेंतर्गत पाण्याचे नमुने तपासणे,उद्यानाची देखभाल करणे यासारखे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

पनवेल महानगरपालिकेने रायगड जिल्ह्यात महिला सक्षमीकरण अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.पालिकेचे समर्पण, नावीन्य आणि अतूट बांधिलकी यांनी जिल्ह्याच्या सामाजिक-आर्थिक विकासात, विशेषत: शासनाच्या सेवा लोकांच्या जवळ आणण्यात आणि महिलांचे सक्षमीकरण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.सार्वजनिक सेवांमध्ये उत्कृष्टतेसाठी महापालिकेने प्रयत्नांनी एक बेंचमार्क सेट केला आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment