News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

रायगड सम्राट व जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्रतीक्षा घाडगे तर उरण तालुकास्तरीय प्रथम क्रमांक हिरामण खुटले ठरले मानकरी

रायगड सम्राट व जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्रतीक्षा घाडगे तर उरण तालुकास्तरीय प्रथम क्रमांक हिरामण खुटले ठरले मानकरी

पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः रायगड सम्राट प्रस्तुत व जे. एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था व आयोजित घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा 2024 चा निकाल आज जाहीर करण्यात आल.शेकाप मध्यवर्ती कार्यालय आयोजित  या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे माजी आमदार बाळाराम पाटील,माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.यावेळी माजी सभापती काशिनाथ पाटील जि प सदस्य विलास फडके, माजी सरपंच अशोक म्हात्रे,माजी उपसभापती राजेश केणी, जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे, रायगड सम्राट संपादक शंकर वायदंडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक कोरेगाव सातारा येथील प्रतीक्षा अमोल घाडगे, दितीय क्रमांक बोरलेचे दिलीप दत्तू पाटील,तृतीय क्रमांक कामोठे दिपाली भरत माने,चतुर्थ क्रमांक नांदगाव अशोक खुठले तर पाचवा क्रमांक दिनेश नाईक आसुडगाव यांना देण्यात आले तर या स्पर्धेत सर्वात जास्त उरण-पनवेल तालुकास्तरीय भाविकांचा चांगला  प्रतिसाद मिळाला असून प्रथम क्रमांकाचे मानकरी तुरमाळेचे हिरामण शांताराम खुठले, द्वितीय क्रमांक गोठवणे उरण चे दीपक वसंत पाटील,तृतीय क्रमांक सावळेचे दिलीप म्हसकर,चतुर्थ क्रमांक मोठी जुईचे जयदास कोळी,पाचव्या क्रमांकाचे कुडावेच्या प्राची संतोष ठोंबरे यांना देण्यात आला,त्याचबरोबर प्रोत्साहनपर पारितोषिक श्रीधर पाटील आसुडगाव हातनोली एकनाथ मते, दापिवली मयूर भोईर रेवस दिनेश मनोरे नारपोली रोशन म्हस्कर, पिरकोन विनिकेत रमेश गावंड बामण डोंगरी चे विलास आंग्रे यांना देण्यात आले.यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित राहू न शकलेल्या भाविकांना बक्षिसे घरपोच देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आयोजकांच्यावतीने जाहीर करण्यात आले.यावेळी समाजसेवक मंगेश अपराज आदी मान्यवरांच्या उपस्थित  हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.माजी आमदार बाळाराम पाटील,माजी नगरसेवक गणेश कडू यांनी रायगड सम्राट संपादक शंकर वायदंडे यांच्या संकल्पनेचे कौतुक केले. त्याचबरोबर जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेला सलग तीन वर्षे उपक्रम राबवित असल्याने शुभेच्छा दिल्या.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment