News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

लग्नाचे आमिष दाखवून सिडको’मधील इंजिनियर तरुणीला लाखोंना गंडा.... ठकसेन विरोधात खारघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

लग्नाचे आमिष दाखवून सिडको’मधील इंजिनियर तरुणीला लाखोंना गंडा.... ठकसेन विरोधात खारघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः लग्न जुळविणार्‍या साईटवर स्वत:साठी वर शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या ‘सिडको’मधील इंजिनियर तरुणीला ठकसेनाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून 2.47 लाख रुपये उकळून तिची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
शशीधर दिलीपकुमार जेरे (33) असे या भामट्याचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.या ठकसेनाने लग्न जुळविणार्‍या साईटवर वेगवेगळ्या नावाने अकाऊंट तयार करुन अनेक तरुणींची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सदर प्रकरणात फसवणुक झालेली 32 वर्षीय तरुणी खारघर येथे राहण्यास असून ती ‘सिडको’मध्ये इंजिनियर म्हणून कामाला आहे. ळया तरुणीने 2021 मध्ये लग्न जुळविणार्‍या साईटवर लग्नासाठी आपले नाव नोंदवले होते. 

त्यानंतर या तरुणीला लग्नासाठी अनेक स्थळ येत होते. मात्र, स्थळ तरुणीला आणि तिच्या वुटुंबियांना पसंत न पडल्याने त्यांनी ते सर्व नाकारले होते. एप्रिल 2024 मध्ये शशीधर दिलीपवुमार जेरे या ठकसेनाने तरुणीची वाशी येथे भेट घेतली.त्यावेळी त्याने त्याचे बँगलोर येथे एमएस आणि इंजिनियरींगचे शिक्षण झाल्याचे तसेच तो टॉरी हॅरिस कंपनीत काम करत असल्याचे सांगितले तसेच त्याचा हॉलेन हॉटेलचा बिझनेस असल्याचे सांगून तक्रारदार तरुणीवर छाप पाडली.त्यानंतर या ठकसेनाने या तरुणीची अनेकवेळा भेट घेतली.यादरम्यान त्याने बिझनेससाठी 4 ते 5 लाखांची आर्थिक मदत हवी असल्याचे सांगून ते पैसे तिला काही दिवसात परत करण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे तरुणीने प्रथम 80 हजार रुपये आणि नंतर एफडी मोडून 90 हजार रुपये ठकसेन शशीधर याला दिले. तसेच शशीधर याने क्लाऊडचे पेमेंट करण्याच्या बहाण्याने तरुणीच्या व्रेडीट कार्डवरुन 77 हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याने या तरुणीला 20 लाख रुपयांचे कर्ज घेण्यास सुध्दा सुचवले. मात्र, सदर तरुणीने त्याला नकार दिला. 

या दरम्यान तरुणीने पैसे परत मागण्यासाठी त्याला संपर्क साधण्यास सुरुवात केल्यानंतर त्याने तिला टाळण्यास सुरुवात केली.दरम्यान,शशीधर याने तरुणीचे फोन आणि मेसेजला प्रतिसाद देणे बंद केल्यानंतर तरुणीला त्याच्यावर संशय आला. त्यामुळे तरुणीने शशीधर बाबत माहिती घेतली असता, त्याच्या विरोधात कर्नाटक राज्यात 2020 मध्ये बलात्कार आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती तिला मिळाली. तसेच शशीधर याने लग्न जुळविणार्‍या साईटवर वेगवेगळ्या नावाने अकाऊंट तयार केल्याचे सुध्दा तिला समजले. त्यानंतर शशीधर याने फसवणूक केल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्यानंतर तिने खारघर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment