आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पनवेलच्या प्राचीन हेल्थकेअरचे संचालक डॉ.मंगेश डाके व डॉ.संगीता डाके यांचा नवभारत- नवराष्ट्र हेल्थकेअर पुरस्काराने सन्मान
पनवेल- आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पनवेलमधील प्राचीन हेल्थकेअरला बेस्ट मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल तसेच प्राचीन हेल्थकेअरचे संचालक डॉ.मंगेश डाके व डॉ.संगीता डाके यांना राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या हस्ते नवभारत- नवराष्ट्र हेल्थकेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुंबईतील ताज हॉटेल येथे झालेल्या नवभारत-नवराष्ट्र हेल्थकेअर पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रात आरोग्य सेवेत काम करणारे हॉस्पिटल,डॉक्टर्स यांना नवभारत-नवराष्ट्र हेल्थकेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या पुरस्कार सोहळ्याला राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत,खासदार प्रियंका चतुर्वेदी,विविध संस्थांचे तसेच नवभारत-नवराष्ट्रचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.डॉ.मंगेश डाके व डॉ.संगीता डाके संचालित प्राचीन हेल्थकेअर गेली अकरा वर्षे पनवेलकरांच्या आरोग्य सेवेत आहे, रुग्णसेवेबरोबरच आरोग्य शिबिरे पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केली आहेत.
Post a Comment