पनवेल महापालिकेच्या शहर अभियंतापदी संजय कटेकर ...शहरातील प्रत्येक बांधकाम विभागाच्या प्रकल्पाची माहिती असलेले अभियंता
पनवेल- सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पनवेल महापालिकेच्या शहर अभियंतापदी संजय कटेकर यांची नियुक्ती करण्यात आली.१ जुलै रोजी कटेकर यांनी नव्या पदाची सुत्रे हाती दिली.राज्य शासनाकडून दोन महिन्यांपुर्वी कार्यकारी अभियंतापदावर पदोन्नती दिली होती.
नगरपरिषद काळात रोजंदारीवर कनिष्ठ अभियंता म्हणून रूजू झालेले संजय कटेकर पनवेल नगरपालिकेतील सर्वांत वरिष्ठ सिव्हील इंजिनियर आहेत.नगरपरिषद काळात त्यांच्या काळात अनेक प्रकल्प त्यांनी मार्गी लावले.शहरातील प्रत्येक बांधकाम विभागाच्या प्रकल्पाची माहिती असलेले इंजिनियर म्हणून कटेकर यांची ओळख आहे.महापालिकेच्या स्थापनेनंतर त्यांना प्रकल्प अभियंता पद देवून प्रशासनाने त्यांच्या अनुभवाचा मान राखला. ३० जून रोजी शहर अभियंता पद रिक्त झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे संजय कटेकर यांची नियुक्ती शहर अभियंता पदावर करण्यात आली.नगरपरिषद काळातील महत्वाच्या पदावर नियुक्ती झालेले कटेकर पहिले अधिकारी ठरले आहे.कटेकर पनवेल तालुक्यातील मुळचे रहिवाशी असलेले भंगारपाडा गावातील रहिवाशी आहेत.कटेकर यांच्या नियुक्तीनंतर अनेकांकडून अभिनंदन होत आहे.आयुक्त मंगेश चितळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. महापालिकेतील कर्मचारी,अधिकार्यांनी कटेकर यांचे अभिनंदन केले आहे.
Post a Comment