पनवेलच्या सावरकर चौकात चार चाकी,मोटासायकलवर झाड पडले ...महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील पडलेले झाड कापून रस्ता वाहतुकीस खुला केला
पनवेल -: पनवेलमधील सावरकर चौकामध्ये आज सकाळी चार चाकी आणि एक मोटासायकलवर झाड पडल्याचे अग्निशमन विभागास कळाले. त्यानंतर पनवेल महापालिकेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि आरोग्य कर्मचारी यांनी वूड कटर मशीनच्या साहाय्याने वाहनांवरील आणि रस्त्यावरील पडलेले झाड कापून बाजूला केले व रस्ता वाहतुकीस खुला करून दिला.
याठिकाणी आरोग्य निरीक्षक जयेश कांबळे,यंत्र चालक कल्पेश पालेकर,अग्निशामक सागर वर्तक,अग्निशामक आशुतोष खानावकर,अग्निशामक विकास घरत,मुकादम सचिन मोहोकर आणि स्वच्छता कर्मचारी सहभागी होते.
आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी पावसाळ्यात आपतकालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन दलास सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आल्या आहेत.त्याप्रमणे महापालिका कार्यक्षेत्रात कोठेही आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ अग्निशमनचे पथक त्या ठिकाणी पोहचून मदत कार्य करते आहे.पावसाळ्यात येणाऱ्या आपतकालीन कामासाठी महापालिकेच्यावतीने विशेष पथकाची निमिर्ती केली आहे तसेच विभागवार आपत्ती काळातील कामकाजाचे वाटप करून देण्यात आले आहे. नागरिकांनी पावसाळ्यात काही आपत्ती ओढवल्यास महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षास 022-27461500 किंवा टोल फ्री नंबर 1800227701 या क्रमांकावरती संपर्क साधवा.
Post a Comment