News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेलमध्ये मुसळधार पाऊस ...रोडपाली आदिवासी वाडीतील ६० घरे पाण्याखाली,पटेल मोहल्ला येथील ७० पुरग्रस्त नागरीक,कोळीवाडा येथील ९० पुरग्रस्त नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलविले ...तात्पुरता निवारा केंद्र सुरू

पनवेलमध्ये मुसळधार पाऊस ...रोडपाली आदिवासी वाडीतील ६० घरे पाण्याखाली,पटेल मोहल्ला येथील ७० पुरग्रस्त नागरीक,कोळीवाडा येथील ९० पुरग्रस्त नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलविले ...तात्पुरता निवारा केंद्र सुरू

पनवेल- : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. पनवेल महानगरपालिकेमार्फत आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.या कक्षामार्फत एकुण 1200 मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे.आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार आपतकालीन पुरस्थिती नियंत्रित करण्याकरीता आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रभागामध्ये पाणी साचलेल्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी पंपिंग मशीन बसविण्यात आले असून साचलेल्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करण्यात येत आहे.महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती-क पनवेल कार्यक्षेत्रातील पटेल मोहल्ला येथील 70 पुरग्रस्त नागरीकांना पमपा उर्दू शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. पनवेल कोळीवाडा येथील 90 पुरग्रस्त नागरीकांना पमपा कोळीवाडा शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. सदर पुरग्रस्त नागरीकांना पमपा मार्फत चहा पाणी व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती-ब कार्यक्षेत्रातील रोडपाली आदिवासी वाडीतील 60 घरे पाण्याखाली गेले असून सदर 250 पुरग्रस्त नागरीकांना रोडपाली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. सदर पुरग्रस्त नागरीकांना पमपा मार्फत चहा पाणी व जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. कळंबोली प्रभागामध्ये पाण्याचा निचरा होणेसाठी एकुण 27 ठिकाणी पंप चालू असून त्यामार्फत पाण्याचा निचरा करण्यात आली आहे. सदर ठिकाणी पनवेल महानगरपलिकेमार्फत 450 कर्मचारी काम करीत आहेत. 

दरम्यान पमपा हद्दीतील पडघे गावातील मुख्य प्रवाहाच्या नाल्यातील पावसाचा प्रवाह कमी झालेला आहे. खारघर प्रभागामध्ये पाण्याचा निचरा होणेसाठी एकुण 14 पंप चालू असून त्यामार्फत पाण्याचा निचरा करण्यात येत आहे.सदर ठिकाणी पनवेल महानगरपलिकेमार्फत कर्मचारी काम करीत आहेत. खारघर प्रभागामधील उपविभाग नावडे विभागात पाण्याचा निचरा होणेसाठी एकुण 5 पंप चालू असून एका ठिकाणी जेसीबी मार्फत  पाण्याचा निचरा करण्यात येत आहे.सदर ठिकाणी पनवेल महानगरपलिकेमार्फत कर्मचारी काम करीत आहेत.

ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत आहे, त्या त्या ठिकाणी धुर फवारणी,व जंतु नाशक पावडर फवारण्यात येत आहे. पनेवल महानगरपालिकेमार्फत वैद्यकीय विभागामार्फत प्रत्येक प्रभागामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी नागरिकांची तपासणी करत आहेत तसेच या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात आलेले आहेत.आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या सूचनेनूसार पावसाचे प्रमाण वाढल्यास महापालिकेने आपली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

दरम्यान आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी पटेल मोहल्ल्यातील भारतनगर,कोळीवाडा विसर्जन घाट याठिकाणी पहाणी केली. तसेच कळंबोलीमध्ये केएलई महाविद्यालय जवळ होल्डिंग पाँईट ,खाडी रस्ता,कळंबोलीतील सिटी हॉस्पीटल,मुख्य रस्ते अशा विविध ठिकाणांना भेट दिली. यावेळी आपआपल्या जबाबदाऱ्या योग्य पध्दतीने पार पाडण्याबाबत आयुक्तांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment