News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

दिड लाखांचा आयफोन घ्यायला वडिलांचा नकार .. १८ वर्षीय मुलाच टोकाचं पाऊल,पनवेलच्या कामोठे येथील घटना

दिड लाखांचा आयफोन घ्यायला वडिलांचा नकार .. १८ वर्षीय मुलाच टोकाचं पाऊल,पनवेलच्या कामोठे येथील घटना

पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे.आयफोन घेण्यास वडिलांनी नकार दिला म्हणून एका 18 वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे.सोमवारी संध्याकाळी कामोठे येथे ही घटना घडली आहे.आपल्या मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याने त्याच्या कुटुंबावर दुः खाचा डोंगर कोसळळा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,या तरुणाला आयफोन घ्यायचा होता.त्याची किंमत दिड लाख रुपये होती.मात्र,त्याच्या वडिलांनी आयफोन घेऊन दिला नाही.त्याच रागातून त्याने त्याने हो टोकाचे पाऊल उचलले.किशोर असे मृत मुलाचे नाव आहे.घडलेल्या घटनेबाबत कामोठेचे सिनियर इन्स्पेक्टर अजय कांबळे यांनी माहिती दिली आहे.किशोरने शाळा अर्धवट सोडली होती.किशोरने त्याच्या वडिलांकडे नवीन आयफोन घेण्याची मागणी केले होती.मात्र,दीड लाखाचा फोन घेण्यासाठी वडिलांकडे पैसे नसल्याने त्यांनी आयफोन घेतला नाही. त्यामुळेच त्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,किशोरच्या वडिलांचा सिमेंटचा व्यवसाय होता.आयफोन हा खूप महाग होता म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला दुसर्‍या कंपनीचा कमी किंमतीचा स्मार्टफोन घेऊन दिला.मात्र,त्यामुळे मुलगा खूप असवस्थ झाला आणि त्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.मुलगा गेल्याने आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment