पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात ‘सफाई आपनाओ, बिमारी भगाओ’ अभियान ....१ ते ३० जुलै २०२४ असा कालावधी
पनवेल - : पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात 1 जुलै ते 30 जुलै दरम्यान स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 अंतर्गत ‘सफाई आपनाओ, बिमारी भगाओ’ अभियान राबविण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवरती पनवेल महानगरपालिकेचे पायुक्त डॉ.वैभव विधाते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या अभियानाची नियोजन बैठक मुख्यालयात घेण्यात आली.
यावेळी घनकचरा आरोग्य विभागाचे विभाग प्रमुख अनिल कोकरे,मुख्य आरोग्य् निरीक्षक शैलेश गायकवाड, अरूण कांबळे, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी, वैद्यकिय आरोग्य विभागाचे प्रतिनिधी, महापालिकेच्या चारही प्रभागातील सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.
या अंतर्गत चार आठवड्यांमध्ये मुख्यत्वे विशेष स्वच्छता मोहिम,लहान मुलांची स्वच्छता व स्वच्छता विषयक सुविधांवर लक्ष केंद्रीत करणे,सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी,कचरा संकलन व वाहतुक,सर्व सामुदायिक व सार्वजनिक शौचालयाची साफसफाई करणे,पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती अतिसार जोखीम क्षेत्रांचे मुल्यांकन,पाण्याच्या गुणवत्तेचे पुरेसे नमुने गोळा करणे, सुरक्षित पिण्याच्या पाण्याची देखभाल करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या घनकचरा व आरोग्य विभाग, शिक्षण विभाग,वैद्यकिय आरोग्य विभागाच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येणार असून या अभियानाचे प्रशिक्षण,एनजीओंचा सहभाग,शिक्षण विभागाच्या जबाबदाऱ्या,वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्याचे कार्यक्रम याबाबत आजच्या बैठकित नियोजन करण्यात आले.यावेळी या अभियानातील आरोग्य निरीक्षकांच्या जबाबदाऱ्या,या अभियानाची कृती योजना,प्रसिध्दी,प्रचार,याबाबत उपायुक्त डॉ.विधाते यांनी सूचना दिल्या.
Post a Comment