News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

लायन्स पनवेल सरगमतर्फे पनवेलमध्ये वृक्षारोपण

लायन्स पनवेल सरगमतर्फे पनवेलमध्ये वृक्षारोपण

पनवेल- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन आज लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे सुशील हाऊस, ठाणा नाका रोड,पनवेल येथे वृक्षरोपण करण्यात आले. पनवेलचे माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला,सुप्रसिद्ध बिल्डर गिरीश कासट,जेष्ठ पत्रकार गणेश कोळी आणि पनवेल सरगम क्लबच्या अध्यक्ष स्वाती गोडसे आणि सभासद यांचे हस्ते झाडे लावण्यात आली. गिरीश कासट यांनी या झाडांची निगा राखण्याचे आश्वासन दिले.सईद मुल्ला यांनी सरगम क्लबच्या सर्व सभासदांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले आणि पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी सर्वांनी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत असे सांगितले. सरगम क्लबच्या अध्यक्ष स्वाती गोडसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि सईद मुल्ला यांच्या वाढदिवसाचा योग या उपक्रमाला जुळून आला हे मोठे भाग्य असल्याचे सांगितले.या उपक्रमाला अलकेश शहा, मानदा पंडित,प्रेमेंद्र बहिरा,संजय गोडसे,प्रणाली बहिरा आदि सभासद उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment