महाराष्ट्र हे बेरोजगाराचं राज्य - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ... कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ पनवेलमध्ये पदवीधर मतदार व कार्यकर्त्यांचा मेळावा
पनवेल- देशामध्ये सर्वात जास्त कुठल्या राज्यात बेरोजगारी असेल तर ते महाराष्ट्र राज्यात आहे म्हणून महाराष्ट्र वाचवायचं काम आपल्याला करायचा आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पनवेल येथे केले.
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ पनवेलमध्ये पदवीधर मतदार व कार्यकर्त्यांचा मेळाव्या प्रसंगी पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नाना पटोले बोलत होते.याप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे आ.जयंत पाटील,माजी मंत्री नसीम खान,शिवसेनेचे उपनेते कदम,राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत पाटील,माजी आमदार बाळाराम पाटील,शिवसेनेचे बबन पाटील, शिरीष घरत,काँग्रेसचे आर.सी.घरत,पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रमेश कीर आदी उपस्थित राहणार आहेत.
यापुढे बोलताना नाना पटोले म्हणाले,ही निवडणूक सर्व पदवीधारकांची आहे.पुण्यातून अनेक उद्योग बाहेर चालले आहेत.महाराष्ट्राची वाताहात करणाऱ्या व्यवस्थेला संपवलं पाहिजे असे पटोले यांनी सांगितले.
शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी,महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं वातावरण आहे.मुस्लिम आणि दलित मतदार हे इंडिया आघाडीच्या पाठीशी आहेत,त्याचा तो फायदा आपल्याला होणार आहे.महाविकास आघाडी,इंडिया आघाडी टिकली पाहिजे असे शेवटी त्यांनी सांगितले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रशांत पाटील,उमेदवार रमेश कीर,शिवसेना नेते कदम यांची भाषणे झाली तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक पनवेल महानगराचे अध्यक्ष सुदाम पाटील यांनी केले.
Post a Comment