कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक .... पदवीधर मतदार व कार्यकर्ता मेळाव्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे आज सायंकाळी पनवेलमध्ये
पनवेल- कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ पनवेलमध्ये पदवीधर मतदार व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मंगळवार दि.१८ जून २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हा मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पाटोळे,शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील,राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड आदी महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
Post a Comment