शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज पनवेल-उरणमध्ये ....मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे- पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ मोटर सायकल रॅली,प्रचार सभा
पनवेल - मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे- पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ काढण्यात येणाऱ्या मोटर सायकल रॅलीत शिवसेना नेते आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत.
सदरची रॅली खारघर येथून सुरुवात होणार असून कामोठे येथे समारोप होणार आहे.आज गुरुवार दिनांक ९ मे २०२४ रोजी दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत ही प्रचार रॅली निघणार आहे तर उरण शहरातील तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी नगरपालिका प्राथमिक शाळेच्या मैदानावर सायंकाळी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह शेकाप आमदार जयंत पाटील,आमदार रोहित पवार,काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बर्गे आदी उपस्थित राहणार आहेत.
Post a Comment