फक्त साहेबांच्या आदेशाची वाट पाहतोय .....लोकसभा निवडणुकीसाठी माजी आमदार विवेक पाटील यांचा आदेश येत नाही तोपर्यंत कुणालाही पाठिंबा नाही असा वहाळ येथील विवेक पाटील समर्थक- निष्ठावंतांच्या मेळाव्यात एकमुखी निर्णय
पनवेल- लोकसभा निवडणुकीसाठी माजी आमदार विवेक पाटील यांचा जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत कुणालाही पाठिंबा नाही असा एकमुखी निर्णय माजी आमदार विवेक पाटील यांच्या निष्ठावंत-समर्थकांचा पनवेल तालुक्यातील वहाळ (उलवे) येथील मेळाव्यात झाला.माजी आमदार विवेक पाटील यांचे कट्टर समर्थक,मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मेळाव्याला असंख्य पदाधिकाऱ्यांसह २० ते २५ गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.
या मेळाव्यात मार्गदर्शन करताना राजेंद्र पाटील म्हणाले,शेतकरी कामगार पक्षामध्ये आज रायगड जिल्ह्यामध्ये जी काही घराणी आहेत.त्यांच्या चार-चार,पाच-पाच पिढया पक्षाचे काम करत आहेत अशा घराण्यातील माणसांना जाणीवपूर्वक डावलण्याचे काम पनवेलमधील पक्षाची मंडळी करत आहेत.या लोकसभा निवडणुकीत विवेक पाटील समर्थक म्हणून आम्ही काम करणार.माजी आमदार विवेक पाटील यांचा आदेश येईल तरच आम्ही काम करू.या निवडणूक प्रक्रियेत सुद्धा माजी आमदार विवेक पाटील यांना डावलले गेले आहे,याबद्दल आमची नाराजी आहे.विवेक पाटील आणि पक्ष यांच्यामुळे आम्ही घडलो.आम्ही ज्या खुर्चीवर बसलो त्या खुर्चीवर आम्हाला विवेक पाटील यांनी हात धरून बसवले.आमच्यावर त्यांचा अधिकार आहे.आमची बांधिलकी माजी आमदार विवेक पाटील यांच्याशी आहे.मलाही माझ्या पक्षाने अनेक निर्णय प्रक्रियेमध्ये डावलले आहे असे राजेंद्र पाटील यांनी सांगून माजी आमदार विवेक पाटील यांचा आदेश येईपर्यंत आम्ही कुणाच्याही उमेदवाराचे काम करणार नाही जर आदेश आला नाही तर आम्ही निवडणुकीत 'नोटा' (NOTA) हा पर्याय ठेऊ असे सांगितले.
यावेळी कार्यकर्त्यांची भाषणे झाली त्या कार्यकर्त्यांनी, राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.पनवेल-उरण मतदारसंघाचे तुम्ही आशेचे किरण आहात.प्रचंड शक्ती,ताकद तुमच्याकडे आहे.दरारा,आवाज तुमच्याकडे आहे.तुम्ही जोमाने पुढे या.निष्ठावंतांवर अन्याय झाला असून हा माणूस अपमान सहन करून उभा आहे.राजेंद्र पाटील यांच्यासोबत पक्षासाठी मरणारे कार्यकर्ते आहेत.निवडणुकीसाठी दिवस कमी राहिले आहेत त्यामुळे कार्यकर्ते माजी आमदार विवेक पाटील यांच्या आदेशाची वाट पाहत असल्याचे शेवटी या कार्यकर्त्यांनी मेळाव्यात सांगितले.
Post a Comment