News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून नाले सफाईची पाहणी ...नालेसफाईसाठी गुगल अर्थच्या साह्याने अत्याधुनिक ‘नाला मॅपिंग’ यंत्रणा

पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून नाले सफाईची पाहणी ...नालेसफाईसाठी गुगल अर्थच्या साह्याने अत्याधुनिक ‘नाला मॅपिंग’ यंत्रणा

पनवेल-  यावर्षी भरपूर पाऊसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.या पार्श्वभूमीवरती नुकतीच मान्सुनपूर्व पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागातील नाले सफाईची पाहणी करून कामकाजाचा आढावा आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी घेतला.यावेळी स्वच्छता व घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ.वैभव विधाते,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महापालिका क्षेत्रात सुमारे 255 किलोमीटरचे 1 हजार 127 लहान नाले आहेत. त्याचबरोबर 60 किलोमीटरचे 105 मोठे नाले आहेत. जून महिन्याच्या सुरूवातीला मान्सूनपूर्व पाऊस येत असल्याने त्याआधी नाले सफाईची सर्व कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी  तळोजामधील मन्नान कॉलनी, खारघरमध्ये कोपरा ब्रीज, बेलपाडा,कामोठ्यातील नौपाडा, नवीन पनवेलमधील बालभारतीच्या मागील नाल्याची पहाणी केली.यावेळी 31 मे पूर्वी सर्व नाल्यांची सफाई कामे पूर्ण होण्याच्या सूचना आयुक्तांनी आरोग्य विभागास दिल्या.

 महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून यांत्रिक पध्दतीने चारही प्रभागातील नालेसफाईला सुरूवात झाली असून, जवळपास 30-40 टक्के काम पुर्ण होत आले आहे. नालेसफाईबरोबरच शहरातील छोट्या-मोठ्या गटारीच्या साफसफाईचे कामही जोमाने सुरू आहे. 
आयुक्तांनी या पहाणी दरम्यान नाल्यातील काढलेला गाळाची योग्यरित्या विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे सांगून,उर्वरीत नालेसफाईची कामे वेगाने करण्याच्या सूचना करण्याच्या सुचना संबधित विभागास दिल्या.

यावर्षी आयुक्त डॉ.प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने नालेसफाईसाठी गुगल अर्थच्या साह्याने अत्याधुनिक ‘नाला मॅपिंग’ यंत्रणा सुरू केली आहे.या यंत्रणेअंतर्गत महापालिकेच्या चारही प्रभागातील मोठ्या नाल्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आले आहेत.जसेजसे नाले साफ केले जातील तसतशी नालेसफाईची माहिती या यंत्रणेच्या माध्यमातून अपडेट होणार आहे.नाले सफाईचे काम सुरू असणाऱ्या नाल्याना पिवळा रंगकाम पूर्ण झालेल्या नाल्याना निळा किंवा हिरवा रंग, काम न झालेल्या नाल्यांना लाल रंग वापरण्यात आला आहे.अशा पध्दतीने या यंत्रणेच्या माध्यमातून नालेसफाईच्या कामकाजाचा आढावा घेणे सहज शक्य होणार आहे.ही यंत्रणा पुढील वर्षीपासून सर्व लहान नाल्यंकरितासुध्दा वापरण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

चारही प्रभागामध्ये  एकुण 867 मनुष्यबळ, 9 जेसीबी, 6 पोकलन,12 टिपरच्या साहाय्याने लहान मोठ्या नालेसफाईचे काम करण्यात येत आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment