मावळ लोकसभा निवडणुकीवर गावठाण विस्तार समिती रायगडचा बहिष्काराचा इशारा ..... अन्यथा प्रत्येक गावोगावी फिरून गावांची एकत्रित मूठ बांधून मतदानावर बहिष्कार टाकणार!
पनवेल- मावळ लोकसभा निवडणुकीवर गावठाण विस्तार समिती रायगडचा बहिष्कार टाकण्याचा निर्णय समितीने घेतला असून त्यासंबंधीचे पत्र जिल्हाधिकारी रायगड,उपविभागीय अधिकारी पनवेल,तहसीलदार पनवेल यांना देण्यात आले आहे.13 मे 2024 रोजी मावळ लोकसभेची निवडणूक होत आहे
त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये, गावठाण विस्तार हक्क समितीच्या माध्यमातून सन 2021,2022,2023 या कालखंडामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून नैना प्रकल्पाच्या विरोधात आमरण उपोषण करण्यात आले होते.दहा-दहा दिवस उपोषणाला बसून देखील सरकारस्तरावर दिलेली आश्वासनाची पूर्तता केली नाही. पनवेल तालुक्यातील पळस्पे गावांमध्ये आमरण उपोषण सोडवते वेळेस गावठाणाच्या बाहेर घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचे लेखी आश्वासन सिडकोकडून 26-6-2023 रोजी दिले होते, एक महिन्याचा कालावधी उलटून गेला असता त्याची कारवाई सुरू केली नाही,त्याउलट सिडकोच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरावर तोडक कारवाई सुरू आहे ही कारवाई करत असताना शेतकऱ्यांकडून अतिशय तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
कॉरिडोरसारखा रस्ता येत असताना रस्त्याच्यामध्ये शेतावरती काही शेतकऱ्यांनी शेतामध्ये वृक्ष लागवड केलेली आहे ती दृश्य वाढवा देखील सातबारा मध्ये नोंद व्हावी.नैना प्रकल्प रद्द करावा.त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर लागू असलेला युडीसीपीआर कायदा 2020 या दरम्यान लागू केलेला आहे तोच कायदा या नैना क्षेत्रामध्ये 95 गावांच्या नयना प्रकल्प बाधित जमिनीला लागू करावा.शेवटी या पात्राच्या माध्यमातून शासनाला एवढे सांगू इच्छितो की आम्हाला न्याय मिळावा अन्यथा आम्ही प्रत्येक गावागावी फिरून सगळ्या गावांची एकत्रित मूठ बांधून उद्याच्या होणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत.जर आमच्या मागण्या सोडवल्या नाहीत तर निवडणुकीमध्ये गावठाण विस्तार समितीच्या माध्यमातून मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत याची नोंद घ्यावी अशी विनंती गावठाण विस्तार हक्क समिती रायगडचे अध्यक्ष अनिल नामदेव ढवळे यांनी पत्राद्वारे केले आहे.
Post a Comment