पनवेलच्या द्वारकादास शामकुमारतर्फे मतदान लोकोत्सव सोहळा ....मतदान करून प्रथम येणाऱ्या ५१ महिलांना पैठणी फ्री तसेच प्रथम येणाऱ्या ५१ पुरुषांना शर्ट पॅन्ट पीस फ्री
पनवेल- मावळ लोकसभेचे मतदान सोमवार दि.१३ मे २०२४ रोजी होत आहे.या मतदानानिमित्त मतदानाची जनजागृती व्हावी तसेच मतदाता जागा हो.. स्वस्त वस्त्र खरेदीचा धागा हो या उद्देशाने पनवेल शहरातील कपड्यांचे भव्य दालन असलेल्या द्वारकादास शामकुमारतर्फे मतदान लोकोत्सव सोहळा आयोजित केला आहे.यानिमित्ताने त्यांनी,मतदान करून प्रथम येणाऱ्या ५१ महिलांना पैठणी फ्री तसेच प्रथम येणाऱ्या ५१ पुरुषांना सियाराम शर्ट पॅन्ट पीस फ्री देण्यात येणार आहे.मतदानाच्या दिवशी सकाळी हे दुकान ७ वाजता उघडण्यात येणार आहे.पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आनंदनगर येथे हे कपड्याचे दुकान असून अधिक माहितीसाठी 9049777544, 8104207793 संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
स्त्री-पुरुष मतदारांमध्ये मतदानाची जनजागृती व्हावी, मतदान वाढावे या अनुषंगाने द्वारकादास शामकुमारतर्फे मतदारांसाठी ही फ्री ऑफर ठेवण्यात आली आहे तसेच या दिवशी इतर खरेदीवर सुद्धा ऑफर ठेवण्यात आली असल्याचे द्वारकादास शामकुमारचे संचालक शरद पाटील यांनी बोलताना सांगितले.
Post a Comment