News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शिवसेनेने केली महाविकास आघाडी विरोधात तक्रार दाखल ... महाराष्ट्रभूषण तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी,स्व. दि.बा.पाटील यांचे प्रचार पत्रकावर फोटो

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शिवसेनेने केली महाविकास आघाडी विरोधात तक्रार दाखल ... महाराष्ट्रभूषण तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी,स्व. दि.बा.पाटील यांचे प्रचार पत्रकावर फोटो

पनवेल दि.२५ (वार्ताहर): - आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शिवसेनेचे महानगरप्रमुख ऍड.प्रथमेश चंद्रशेखर सोमण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 33 मावळ लोकसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी,पनवेल यांच्याकडे महाविकास आघाडी विरोधात तक्रार दाखल केली आहे. 

 या तक्रारीत प्रथमेश सोमण यांनी म्हंटले आहे की,  मी अर्जदार प्रथमेश चंद्रशेखर सोमण महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचा प्रतिनिधी या नात्याने आपणास कळवू इच्छितो की, महाविकास आघाडीतर्फे उबाठा गटाच्या माध्यमातून मशाल चिन्हावर निवडणूक लढवित असलेल्या संजोग भिकू वाघेरे पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवारांने आपल्या प्रचार साहित्यावर ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्रभूषण तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांचा फोटो आपल्या प्रचार पत्रकावर राजकीय नेत्यांसोबत छापला आहे.प्रत्यक्षात प्रचार करताना अशा प्रकारे नानासाहेब धर्माधिकारी यांचा फोटो वापरणे हे अत्यंत चुकीचे व बेकायदेशीर आहे.मावळ किंवा रायगड जिल्ह्यातील नानासाहेब धर्माधिकारी यांना मानणारा लाखोंचा जनसमुदाय आहे. नानासाहेब धर्माधिकारी हे सर्वांनाच दैवता समान आहेत, परंतु त्यांचा फोटो त्यांच्या कुटुंबाच्या किंवा त्यांना मानणाऱ्या लाखो श्री सदस्यांच्या संमतीशिवाय अशा प्रकारे प्रचार साहित्यवर छापून श्री सदस्य व मतदारसंघातील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणे, मतदारांची दिशाभूल करणे व त्यांमध्ये खोटा समज पसरवण्याचा उद्योग सदर वरील उमेदवार यांचे कडून झालेला आहे.सबब,महाराष्ट्रभूषण तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी,स्वर्गीय दि.बा.पाटील अशा विभूतींचे फोटो त्वरित प्रचार साहित्यावरून हटवण्याचे आदेश संबंधित उमेदवार यांना द्यावेत तथा असा फोटोचा गैरवापर प्रचार करण्यासाठी केल्याबद्दल आचारसंहिता भंगासह योग्य आवश्यक त्या नियमांच्या अधिन राहून गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment