दिल्ली येथे राष्ट्रीय युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धा.... ५२ सुवर्णपदक,३३ रौप्यपदक आणि ५ कांस्यपदकांसह महाराष्ट्र युनिफाईट संघास प्रथम अजिंक्यपद
पनवेल- दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धा पार पडली या स्पर्धेत ५२ सुवर्णपदक,३३ रौप्यपदक आणि ५ कांस्यपदकांसह महाराष्ट्र युनिफाईट संघाने प्रथम अजिंक्यपद मिळवले आहे. महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून श्री.सुनील वडके ,श्री.रवींद्र म्हात्रे,श्री.सागर कोळी,श्री.विनोद कुंजीर ,श्री.प्रतिक कारंडे यांचे मार्गदर्शन लाभले युनिफाईट वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष श्री.संतोष खंदारे,महासचिव डॉ.मंदार पनवेलकर तसेच राष्ट्रीय युनिफाईट संघटनेचे अध्यक्ष श्री.विशाल सिंग यांनी संपूर्ण महाराष्ट्र संघाचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post a Comment