News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेलच्या ओरियन मॉलचा ८ वा वर्धापन दिन ... वर्धापन दिनानिमित्ताने १९ एप्रिल ते १९ मे २०२४ दरम्यान कार्निवल फेस्टिवलचे आयोजन

पनवेलच्या ओरियन मॉलचा ८ वा वर्धापन दिन ... वर्धापन दिनानिमित्ताने १९ एप्रिल ते १९ मे २०२४ दरम्यान कार्निवल फेस्टिवलचे आयोजन

पनवेल:पनवेलच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि येथील रहिवाशांना मनोरंजन,ब्रँडेड वस्तु,कपड्यांच्या खरेदीसाठी एकमेव पर्याय असलेल्या पनवेल शहरातील ओरियन मॉल आपला वर्धापन दिन दि.१९ एप्रिलपासून साजरा करीत आहे.या वर्धापन सोहळ्यानिमित्त मॉलच्यावतीने ओरियन मॉल कार्निवल आयोजित केले आहे.

या कार्निवलमध्ये शॉप अँड वीण सारखी लकी ड्रॉ तसेच मॉलमध्ये सायकलिंग सह लहान मुलांसाठी जगलर,कार्टून पोशाखातील मेस्कॉट आणि बँड बॉईज असे विशेष आकर्षणाचे कार्यक्रम तर आहेतच, सोबत वर्धापन दिनाचा केक मॉलचे ग्राहक,विक्रेते व सर्व कर्मचारी यांस सोबत दि.२७ एप्रिल रोजी कापून ओरायन मॉल आपला वर्धापन दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे.दि.१९ एप्रिल ते १९ मे २०२४ दरम्यान हा कार्निवल चालणार आहे.यावेळी ३ हजारांपर्यंत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लकी ड्रॉ द्वारे विविध आकर्षक बक्षिसे मिळविण्याची संधी देखील या कार्निवलच्या रूपाने उपलब्ध करून देण्यात आली आहे.या स्पर्धेतील विजेत्यांना ब्लू स्टोनतर्फे सोन्याचे दागिने तसेच लेकेअँम्प (Lekeamp) तर्फे ई बाईक बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.या संधीचा फायदा घेण्यासाठी पनवेलकरांनी या कार्निवलमध्ये सहभागी होऊन मॉलला भेट देण्याचे आवाहन ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर ,दिलीप करेलिया आणि मनन परुळेकर यांनी केले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment