News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

नववर्ष स्वागत समिती पनवेलतर्फे गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा मिरवणुकीची जोरदार तयारी..शोभा यात्रेचे रौप्यमहोत्सवी वर्ष, वेशभूषा स्पर्धेचे आयोजन

नववर्ष स्वागत समिती पनवेलतर्फे गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा मिरवणुकीची जोरदार तयारी..शोभा यात्रेचे रौप्यमहोत्सवी वर्ष, वेशभूषा स्पर्धेचे आयोजन

पनवेल - नववर्ष स्वागत समिती पनवेलतर्फे भव्य शोभायात्रा मिरवणुकीची जोरदार तयारी सुरू आहे.यावर्षीचे हे शोभा यात्रेचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून यावर्षी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

गुढीपाडव्यानिमित्त मंगळवार दि.९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ६.३० वाजता पनवेलच्या वडाळे तलाव येथून ही भव्य शोभायात्रा मिरवणूक निघणार आहे.पुढे शोभा यात्रेचा मार्ग असा असेल - सुरुवात वडाळे तलाव,बाठीया बंगल्यासमोर -गावदेवी मंदिर - आगरी समाज सभागृह - लाईन आळी - छत्रपती शिवाजी महाराज मार्ग - जुने आदर्श हॉटेल - गावदेवी मंदिर - धुतपापेश्वर कॉर्नर - जुने पोस्ट - श्री विरूपाक्ष मंदिर - जय भारत नाका - लोकमान्य टिळक पथ - समाप्ती स्वातंत्र्यवीर सावरकर चौक असा असेल.
या शोभायात्रेत वेगवेगळ्या संस्था सामाजिक संघटना,वाद्य पथक सहभागी होणार आहेत त्यामध्ये
सनई चौघडा,राम रथ.श्री विरूपाक्ष महादेव मंदिर न्यास,समर्पण ध्यान केंद्र,भारत विकास परिषद,सिंधुदुर्ग रहिवासी संघ,वसुंधरा फाउंडेशन,(चित्र रथ),जरीमरी महिला मंडळ,महिला वकील संघटना,वनवासी कल्याण आश्रम,डॉ.कुरळकर कर्णबधीर व मतिमंद मुलांची निवासी शाळा,बँड पथक तक्का,जीवन विद्या मिशन,
गांधार नाट्यकला संस्था,युवानाथ ढोल पथक,
ध्वज पथक,झांज पथक (महिला),केशवस्मृती पतसंस्था, सिटीजन युनिटी फोरम,जय भारत नाका मित्र मंडळ,जेष्ठ नागरिक संघ पनवेल,(जनजागृती) नंदकिशोरधोत्रे,प्रशिक ऍम्ब्युलन्स,शंख पथक,गार्गीज ग्रुप सहभागी होणार आहेत.

या शोभा यात्रेनिमित्त वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,त्यामध्ये गट क्रमांक १ मध्ये वयोगट १ते ७ वर्ष विषय- संत,देवदेवता ... गट क्रमांक २ मध्ये वयोगट ८ ते १५ वर्ष विषय- स्वातंत्र्यसेनानी,क्रांतीकारक .... गट क्रमांक ३ खुला गट वय १५ वर्षावरील विषय-प्रांतीय वेशभूषा, अत्यावश्यक सेवा कर्मचारी (किमान तीन जणांचा समूह असावा) असे विषय ठेवण्यात आले आहेत.अधिक माहितीसाठी संपर्क १) सौ.सोनाली शेठ - ९३२००९९४१७२) सौ.सुनीता खरे - ९९६९४३०२३५

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment