News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

लेखक गज आनन म्हात्रे यांच्या 'आठवणींच्या रंगीत चिमण्या'कादंबरीवर पनवेलमध्ये चर्चासत्र ... कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचा उपक्रम

लेखक गज आनन म्हात्रे यांच्या 'आठवणींच्या रंगीत चिमण्या'कादंबरीवर पनवेलमध्ये चर्चासत्र ... कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचा उपक्रम

पनवेल - कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्यावतीने नव्या मुंबईतील सुप्रसिद्ध लेखक गज आनन म्हात्रे लिखित आठवणींच्या रंगीत चिमण्या या कादंबरीवर पनवेलमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार दिनांक ६ एप्रिल २०२४ सायंकाळी ५ वाजता पनवेलच्या के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालयामध्ये या चर्चासत्राच्या आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्कप्रमुख रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील भूषवणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्य अभ्यासक देविदास पोटे तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ.अविनाश पाटील,कोकण मराठी साहित्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष,माजी शिक्षण संचालक रोहिदास पोटे,योगेशचंद्र लोहकरे उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी केले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment