News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेलमध्ये मावळ लोकसभा महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार घरोघरी-दारोदारी ..... कार्यकर्त्यांमध्ये फोटो आणि सेल्फीचा उत्साह

पनवेलमध्ये मावळ लोकसभा महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार घरोघरी-दारोदारी ..... कार्यकर्त्यांमध्ये फोटो आणि सेल्फीचा उत्साह

पनवेल - मावळ लोकसभेची निवडणूक १३ मे २०२४ रोजी होत आहे,मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे- पाटील यांचा पनवेलमध्ये प्रचार घरोघरी-दारोदारी सुरू झाला आहे.महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचाराचा चांगलाच उत्साह आहे.पनवेल महानगरातील सोसायट्या,दुकाने,रस्त्यातून येणारे-जाणारे नागरिक,ज्येष्ठ नागरिक,तरुण यांच्यापर्यंत कार्यकर्ते उमेदवारांची माहिती पोहोचवत आहेत.आमच्याच उमेदवाराला मत द्या हे पटवून कार्यकर्ते सांगत आहेत.
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची निशाणी धनुष्यबाण तर इंडिया महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे-पाटील यांची निशाणी मशाल आहे.
कार्यकर्त्यांकडून उमेदवारांची माहिती,पक्षाची भूमिका पत्रक वाटून मतदारांपर्यंत पोहोचवली जात आहे.प्रचार करताना कार्यकर्त्यांमध्ये फोटो आणि सेल्फीचा चांगलाच उत्साह आहे,आणि तो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment