रमझानच्या महिन्यात मोहल्यामध्ये नियमित सफाई व स्वच्छता केल्याबद्दल सिटीजन वेल्फेअर असोसिएशने पनवेल महानगरपालिकेचे मानले आभार
पनवेल - रमझानच्या महिन्यात पनवेलच्या मोहल्यामध्ये नियमित सफाई व स्वच्छता केल्याबद्दल सिटीजन वेल्फेअर असोसिएशने पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.प्रशांत रसाळ व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे भेटून आभार मानले आहेत.
सिटीझन वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांच्यासह त्यांच्या पदाधिकारी यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.प्रशांत रसाळ यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी दिलेल्या आभार पत्रामध्ये,मुस्लिम बहुल क्षेत्रामध्ये चिंचोळ्या गल्लीत रस्ते,गटारे हे रमझानच्या पवित्र महिन्यात आपल्या स्वच्छता दूतांमार्फत सफाईचे व स्वच्छतेचे काम नित्यनेमाने व अत्यंत काळजीपूर्वक करण्यात येत होते,त्याबद्दल या परिसरातील नागरिकांनी रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.हा स्तुत्य् उपक्रम यापुढेही सातत्यपणा ठेवून अशाच प्रकारची सफाई स्वच्छता राखावी ही विनंती करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे तळोजा मजकूर, तळोजा गावठाण,तळोजा पाचनंद या संपूर्ण क्षेत्रात सफाई व स्वच्छता नित्यनेमाने होणे जरुरीचे आहे.सफाई करताना औषध फवारणी,धूर फवारणी देखील दिवसा आड झाल्यास दुर्गंधी व डासांच्या प्रादुर्भावाने होणाऱ्या आजाराला आळा बसेल. सहकार्याबद्दल पुन्हा एकदा सईद मुल्ला यांनी महानगरपालिकेचे आभार मानले आहेत.
Post a Comment