ग्राहकांनी नळ जोडणीवर जलमापक बसविण्याच्या पनवेल महानगरपालिकेच्या सूचना ...धोरणात्मक निर्णय,पाण्याची बचत,ग्राहकाला आर्थिक बोजा नाही
पनवेल- ग्राहकांनी नळ जोडणीवर जलमापक बसविण्याच्या सूचना पनवेल महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आल्या आहेत.
पनवेल महानगरपालिकेमार्फत पनवेल शहर व 29 गावांतर्गत गृहसंकुल,सोसायट्या,घरे चाळी, उपहारगृहे,शाळा,कॉलेजमध्ये सर्व ग्राहकांच्या नळ जोडणीवर जनमापक बसवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे, सदरचे जलमापक बसविल्यानंतर पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.जलमापक बसवल्याने नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण होणार आहे.सध्या सोसायटीला किंवा स्वतंत्र घर असणाऱ्यांना पनवेल महानगरपालिका पाणीपुरवठा विभागामार्फत जलमापक खरेदी करण्यास सांगत येत होते परंतु पनवेल महानगरपालिकेमार्फत ग्राहकांना कोणतेही प्रकारचे शुल्क न करता विनाशुल्क जलमापक बसवण्यात येणार आहेत.
सदर जलमापक हे अचूक व योग्य असून सर्व तांत्रिक निकष हे पनवेल महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत तपासणी करून घेण्यात आलेले आहेत. जलमापक बसवल्यानंतर देखभाल व दुरुस्ती तीन वर्षापर्यंत पनवेल महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे,त्यामुळे ग्राहकांवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा येणार नाही. पनवेल महानगरपालिकेने घेतलेला धोरणात्मक निर्णय हा ग्राहकांच्या व पनवेल महानगरपालिकेचा हिताचा असून जलमापक बसवल्याने पाण्याचा गैरवापर आळा बसणार असल्याने ग्राहकांनी जलमापक बसवावे अशा सूचना पनवेल महानगरपालिकेने केल्या आहेत.
Post a Comment