News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

लग्न जुळवण्याचा नावाखाली तरुणीची ६ लाख रुपयांची फसवणूक ... ठार मारण्याची धमकी,तरुणीची खारघर पोलीस ठाण्यात तक्रार

लग्न जुळवण्याचा नावाखाली तरुणीची ६ लाख रुपयांची फसवणूक ... ठार मारण्याची धमकी,तरुणीची खारघर पोलीस ठाण्यात तक्रार

पनवेल दि.३० (वार्ताहर): लग्न जुळवण्याच्या साईटवर स्वतःसाठी वर शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या २८ वर्षीय तरुणीकडून एका भामट्याने ६ लाख ३१ हजारांची रक्कम उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.नबील मुनीर खान (३०) असे या भामट्याचे नाव असून,खारघर पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणात फसवणूक झालेली २८ वर्षीय तरुणी खारघर परिसरात आईवडील व बहिणीसह राहण्यास आहे. ही तरुणी एका एक खाजगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे.या तरुणीने वर्षभरापूर्वी स्वतःसाठी वर शोधण्यासाठी लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवर आपली नोंदणी केली होती. त्यानंतर नोव्हेंबर २३ मध्ये नबील मुनीर खान या भामट्याने या तरुणीसोबत ओळख वाढवली होती.त्यानंतर नबील याने या तरुणीसोबत व्हॉट्सअॅपवरून चॅटिंग तसेच बोलणे सुरू केले होते. तसेच त्याने तरुणीच्या वडिलांसोबत फोनवरून बोलणी करून त्यांच्या मुलीसोबत लग्न करण्याची इच्छादेखील व्यक्त केली होती.त्यावेळी भामट्या नबील याने त्याचे मूळ गाव महाड येथे असल्याचे व सध्या तो मुंब्रा येथे राहत असल्याचे सांगितले होते तसेच त्याचा दक्षिण आफ्रिका देशात मायनिंगचा तर मुंबईतील डोंगरी भागात टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असल्याचे सांगून 10 तरुणीवर आपली छाप पाडली होती. त्यानंतर भामट्या नबील याने तरुणीसोबत व्हॉट्सअॅप चॅटिंग,कॉलिंगद्वारे संवाद सुरू ठेवून तिचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर भामट्या नबीलने तो दक्षिण आफ्रिकेत असल्याचे तसेच भारतातील त्याचे बँक खाते फ्रीज केल्याचे तसेच बिझनेससाठी त्याला पैशांची गरज असल्याचे अशी वेगवेगळी कारणे सांगून तरुणीकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली.नबील हा होणारा पती असल्याने या तरुणीनेदेखील त्याला सुरुवातीला १ लाख ३७ हजार रुपये ऑनलाइन पाठवून दिले. मात्र, त्यानंतर भामट्या नबीलने आईचे ऑपरेशन, भारतात येण्यासाठी विमान तिकिटासाठी तसेच व्यवसायामध्ये नुकसान झाल्याचे कारण सांगून तरुणीला वेगवेगळ्या व्यक्तींच्या बँक खात्यांत पैसे पाठवण्यास भाग पाडले.

अशा पद्धतीने भामट्या नबील याने चार महिन्यांमध्ये या तरुणीकडून तब्बल ६ लाख ३१ हजारांची रक्कम उकळली.मात्र, त्यानंतर देखील भामटा नबील तरुणीकडून पैशांची मागणी करतच राहिल्याने तरुणीला त्याच्यावर संशय आला.त्यामुळे या तरुणीने त्याच्याकडे आपली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली असता,त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या तरुणीने त्याला पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगितले असता,त्याने तरुणीला ठार मारण्याची धमकी दिली.त्यानंतर या तरुणीने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment